ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन
भारत सरकारमान्य संस्था आपल्या सेवेस समर्पितऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन ही भारत सरकारमान्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य क्षेत्रात (Health) भरीव काम केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबीर घेणे, शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेचे प्रतिनिधी करत असतात अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी असणाऱ्या शासनाच्या आरोग्य योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,आयुष्मान भारत) या व इतर योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेचे प्रतिनिधी आरोग्य,आहार,स्वच्छता याबद्दल गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करत असतात. कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे,एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होते त्यासाठी योग्य आहार कोणता तसेच कुपोषणाची लक्षणे कोणती याविषयी जनजागृती केली जाते. अपंगत्वाचे प्रकार अपंगत्वाची कारणे,अपंगांसाठी असणाऱ्या शासनाच्या सवलती,अपंग मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी विषयी माहिती देण्याचे काम वेगवेगळ्या शिबिरातून केले जाते.
समाजातील दानशूरांच्या सहकार्याने रुग्णाला मदत करत त्याच्या उपचारासाठी वेळोवेळी सहकार्य करणे, रुग्णाला वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोच करण्याचे काम संस्थेचे 'आरोग्यदूत' करत असतात.
व्यसनमुक्ती अभियान राबवत व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणे, कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्र स्थापन करणे, मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबविणे, ग्रामीण भागात रुग्णावाहीका, बाईक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे व प्रत्येक तालुक्यात ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे हा संस्थेचा उद्देश आहे.
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन ही भारत सरकारमान्य संस्था असून या संस्थेला दिलेली देणगी आयकरातील सूट घेण्यास पात्र आहे.
Acct Name – RUGAVED HEALTH BARAMATI FOUNDATION Bank Name- Kotak Mahindra bank Acct no – 0048273312 IFSC Code – KKBK0002103 CRN No-800106970 Branch – Ravivar Peth, Pune PAN NO – AAMCR9394K TAN NO – PNER32950B 12A- AAMCR9394KE20231 80G-AAMCR9394KF20231
प्रकल्प
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) : आमचे इतर प्रकल्प
व्यसनमुक्ती
व्यसनमुक्ती अभियान राबवणे
कुपोषण मुक्ती
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.
मतिमंद नियंत्रण
मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
आरोग्य अभियाने
ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.
शिक्षण
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.
DTSE
DIAMOND TALENT SEARCH EXAMINATION (DTSE)या नावाने राज्य व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
व्यक्ती आजारी पडल्यानंतर झटपट रुग्णालयात न जाता आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजार वाढतो आजाराचे निदान होण्यास वेळ लागतो त्यामुळे उपचारास होणारा खर्च वाढतो. आरोग्य सुरक्षा कार्ड योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे, शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य ही संपत्ती आहे ( Health is Wealth)एक वेळ पैसा संपला तर तो कमवता येईल पण आरोग्य संपलं तर कमवता येत नाही याचे महत्त्व पटवून देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे प्रतिनिधी,संस्थेचे आरोग्य दूध करत असतात गावोगावी वाऱ्या वस्त्यावर ही योजना राबवत असताना योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कार्ड दिले जाते. आरोग्य सुरक्षा कार्ड धारकांना तालुक्याच्या ठिकाणचे खाजगी डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक ही बिलामध्ये सवलत देऊन सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून डॉक्टर,लॅब व मेडिकल चालक पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्हाला सहकार्य करत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासून सर्व विषयांचा चिकित्सकणे अभ्यास करायाची सवय रुजविणे, तसेच इ.५वी व इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परिक्षेची तयारी करून घेणे, भविष्यातील स्पर्धा परिक्षांचा पाया मजबुत करणे व मुलांना सक्षम व धाडसी करणे हा परिक्षा घेण्यामागचा उद्देश आहे. हि परिक्षा स्वयंअध्ययनावर असते. प्रश्नसंच मुलांच्या मराठी, गणित, इंग्रजी या पुस्तकावर आधारित त्यामुळे मुलांचा चालू वर्षाचा अभ्यास होण्यास मदत होते.
व्यसनमुक्ती अभियान राबवणे
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.
मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.
"आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!"
आपल्या किंवा कुटुंबातील सदस्यांना आरोग्यसंबंधी काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क करा.