प्रकल्प
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) : प्रकल्पडायमंड टॅलेंट सर्च परीक्षा(DTSE)
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन ही भारत सरकारमान्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासून सर्व विषयांचा चिकित्सकणे अभ्यास करण्याची सवय रुजविणे, तसेच इ.५वी व इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परिक्षेची तयारी करून घेणे, भविष्यातील स्पर्धा परिक्षांचा पाया मजबुत करणे व मुलांना सक्षम व धाडसी करणे तसेच मुलांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करणे हा परिक्षा घेण्यामागचा उद्देश आहे. हि परिक्षा स्वयंअध्ययनावर असते. प्रश्नसंच मुलांच्या मराठी, गणित, इंग्रजी या पुस्तकावर आधारित त्यामुळे मुलांचा चालू वर्षाचा अभ्यास होण्यास मदत होते.
आरोग्य सुरक्षा कार्ड
व्यक्ती आजारी पडल्यानंतर झटपट रुग्णालयात न जाता आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजार वाढतो आजाराचे निदान होण्यास वेळ लागतो त्यामुळे उपचारास होणारा खर्च वाढतो. आरोग्य सुरक्षा कार्ड योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे, शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य ही संपत्ती आहे ( Health is Wealth)एक वेळ पैसा संपला तर तो कमवता येईल पण आरोग्य संपलं तर कमवता येत नाही याचे महत्त्व पटवून देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे प्रतिनिधी,संस्थेचे आरोग्य दूध करत असतात गावोगावी वाऱ्या वस्त्यावर ही योजना राबवत असताना योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कार्ड दिले जाते. आरोग्य सुरक्षा कार्ड धारकांना तालुक्याच्या ठिकाणचे खाजगी डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक ही बिलामध्ये सवलत देऊन सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून डॉक्टर,लॅब व मेडिकल चालक पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्हाला सहकार्य करत आहेत.